संगमनेर - नरेंद्र मोदी रिझल्ट देणारे नेते आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ते बोलतात ते करून दाखवतात. मोदी लाटेत मिळालेली मते ही नुसती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचीच नाहीत, तर कॉंग्रेस, मुस्लिम, दलित या सर्वांची आहेत, असे मत भाजपचे राष्ट्रीय सचिव श्यामसुंदर जाजू यांनी आज व्यक्त केले.
"लाट म्हणजे चळवळ आहे. ती थांबत नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाला एकही जागा मिळालेली नाही; परंतु क्रमांक दोनची मते त्यांनी घेतली,' असे मोदींच्या विजयाचे विश्लेषण त्यांनी केले. जाजू मूळचे संगमनेरमधील असून ते एका विवाह समारंभानिमित्त आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""कॉंग्रेसचे राज्यसभेत 59, तर लोकसभेत 42 खासदार आहेत. मतदारांनी राजघराण्यातील लोकांना बाजूला काढून सामान्य माणूस तेथे पाठविला. हा करिष्मा मोदींच्या नेतृत्वाचा आहे. ते एकमेव मुख्यमंत्री असे आहेत, की सत्काराच्या रूपाने मिळालेल्या सर्व वस्तूंचा त्यांनी लिलाव केला व त्यातून आलेली तीन कोटींची रक्कम महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी खर्च केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. ते मुख्यमंत्री झाल्यापासून एकही दिवस असा गेला नाही, की त्यांच्यावर टीका झाली नाही. समस्या ही संधी समजून ते पुढे वाटचाल करतात.'

No comments:
Post a Comment